पान:इंदिरा.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०८ धराल माझ्या कार्या हातीं, कराल सिद्धी जाणें निश्चितीं, मुळिंच मजला कांहीं भीती नुरली हो आतां. १६१ पद. ( "बहुत छळियलें " – या गर्म्याचे चालीवर. ) वरिन तुह्मांप्रती; नाहीं स्त्रीला अन्य गती ! ध्रु० ॥ या-उपरी राहूं ऐक्यें या । तुझि आह्मी ! प्रेमें सौख्यें अवध्या जन्मीं विलसूं या ! हो भारी तुझी श्रमलां, यशस्वि जाहलां अंतीं! वरिन" ० १६२ श्लोक. बोले राजकुमार तैं हरिखुनी:-"अंतीं तुला भावलों ! झालों मी कृतकृत्य गे अजि अहा ! जें इच्छिलें, पावलों; जाये ! मेळविलें तुला श्रम - नुदे ! इच्छा नुरे या मना; ठेवोनी तुजठायें चित्त, तुजला सेवीन सर्वात्मना"! १६३ पद. रागिणी भैरवी, ताल त्रिवट, पंजाबी. ( “अब मोरी छांड दे " या चालीवर.) सुफळित जाहलें, । आणिलें तडीं विचारें सारें; ॥ संधि झाला शेवटिं हा ! ॥ ध्रु० ॥ कवणा इच्छित जरि पाहिजे, ॥ दम धरुनि करितां श्रमचि ये साधुंहि तया नरा; सुफळित० १६४. संलग्ननामक सातवा सर्ग समाप्त.