पान:इंदिरा.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०६ तूं असशी गे प्राणप्रिया ! पाणि तुझा गे ! दे धरण्या ! १५३ पद. राग भूप, ताल त्रिवट. ( " ललचावते”—या चालीवर " ) वर गे वर सुंदरी मातें ! आलों आशा धरुनी वरण्या तुला बहू यलें गे ! ।। ध्रु० ॥ पुरविं मनीषा, पाणि मला दे, घे तुझ्या पदरीं मला; उभयतां होऊं सुखी प्रिये ॥ वर गे वर० ।। १ ।। १५४. पद. ( "सुंदरमुख तुंदिलतनु" या चालीवर. ) सखि ! तव सुखदायक मुखकमळ विमळ सें सुललित अलिसम लक्षुनि तृप्त होतसें. ध्रु० सरळ नाक, कुरळ केश, विरळ दंत ते, नयन विनयभरित बघुनि हरिणि लाजते, गजगति तव कोमळ पदिं बहु विराजते; ये गे ! वेगें, संगें हृद्रमणी ! चिद्भरणी! सुखतरणी उगवुं दे सवें ॥ १ ॥ सखि ! तव० धी प्रचंड पंडितजनमान खंडिते, आचरण प्रेमळ बहु कुजन दंडितें, मधुर वचन वाद कधिं न करि वितंड तें, तोषी ऐशी राशी सुगुणांची, सुकृताची; कर याचीं, 'वरिन' वद मुखें ! ॥ २ ॥ सखि तव ० ललना अशि, भाग्यशालि नर असेल जो, त्यासि सुलभ; दिव्य रूप तो तुझें पुजो, प्रेमलता तव हृदिं मज उद्देशूनि रुजो !