पान:इंदिरा.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०५ तुझ्या अंगिं जें व्यंग तें माणसीं गे बहू थोडकें सर्व व्यक्तींत जागे. १४७ जशी आहेशी तूं, तशि मज पुरी भावशि भली; पहाया स्त्री जातां सकळ - रिति पूर्णा प्रतिकुळीं प्रतापें यत्नें ही जगिं हुडकिल्या नाहिं मिळणें ; तुझ्या ऐशी स्त्री गे कधिं वरिलिसे काय कवणें ? १४८ साकी. तृप्ति मनाची न होइ जो जों पाहीं तव मुख-चंद्रा, इंद्रभुवनि का अधिक याहुनी सौख्य होतसे इंद्रा ? नाहीं जोड तुला ! | सखये, वरुनी सुखविं मला ! १४९ श्लोक. वर बधिं सखये तूं पाहिं गे या मुखाला ! नयन उघडिं, सौख्या पाववीं उत्सुकाला ! क्षितिजिं उगवुनी तो भानु जेवीं जगातें सुखकर बहु होई, होई तूं तेविं मातें ! १५० श्रम अजिवरि केले, सार्थता प्राप्त झाली, समरिं हरुनि गेलों, इंदिरा जाणियेली ! तव करिं पय-पाणी- अन्न म्यां सेवियेलें, पुनरपि बळ आलें, तैं तुला मोहियेलें ! १५१ तैं श्लोक. ( मणिबंध. ) होइं ग! आतां तूं नवरी ! बोलुं नको गे ! कीं 'न वरीं'; दावि सुखा संसारिं मला, प्रेमभरें रक्षीं मजला ! १५२ आणिक सांगू काय तुला ? कंठ वदे हैं, तैं सुकला ! १८