पान:इंदिरा.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०४ तोचि ओळखितो पुरा स्त्रीस्वभावा- नरा मैत्रिण स्त्री अशा धरी भावा." १४१ सती बोले तयिं तया इंदिरा ती;- “अशा मातेच्या वाढला सुहस्तीं, काय मज ऐशा वरुनि, पामरीं तो प्रेम ठेविल ? का पुरखुं शके हेतो ? १४२ श्लोक. वाटे मला क्षुद्र असें बहू मी,, नाहीं जगाच्या मुळिं कांहिं कामीं; माझ्यावरी ठेवुनि प्रेमभावा संसारिं लाभेल कुणा विसांवा ? " १४३ बोले तदा तो तिज राजपुत्रः- " प्रीतीस माझ्या असशी सुपात्र ! मी बाळ होतों तंवपासुनीयां, देहास गे वाहियलें तुला या! १४४ हो तूंच माझी सुखदा सुजाया; गे लाविली त्वां मजलागिं माया ! त्वां रक्षिला प्राण दयाळु हातें, संसारसौख्या तरि देई मातें. १४५ होती जिवाच्या-वरि धाड आली, पाजोनियां औषध दूर केली; त्वां अन्नपाणी मुखिं घालियेलें, तैं प्राणतंतूप्रति लांबवीलें. १४६ जरी व्यंग कांहीं तुझ्या अंगि नांदे, तरीही मला सुंदरी तूं वरूं दे;