पान:इंदिरा.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०३ लोक. "अशा हो भ्रमामाजि, " तैं राजबाळी वदे, “राहिलें व्यर्थ मी एककाळीं; स्त्रियेपासुनी कोणच्या भाग्यशाली तुह्मां ज्ञान हैं; वृत्ति ही प्राप्त झाली !" १३६ श्लोक. कुमारानें तीतें बहुत विनयें उत्तर दिलें, “ स्वयें स्त्रीसंबंधे विविध परि ज्ञाना मिळविलें; स्त्रियांच्या मैत्रीचा परम सुख भोक्ता अग असें ! स्त्रियांवीणें ना तें सुख पुरुषजातीप्रति दिसे. १३७ नभा शशिविणें जशी कधिं न येइ शोभा पुरी, स्त्रियेविण तशी न ये कधिं जना गृहा- भीतरीं; अमोलिक बहू असें मजसि ज्ञान हें लाभलें सुमाय-करिं वाढतां, अधिं तिच्या मुखें ऐकिलें. १३८ मन्माता सकळांस ती बहु-रिती होती सुवंद्या प्रिया, भूलोकीं वसुनी दिसे सकळिकां भूलोकिंची कीं न या; वाटे कीं कुणि ही असे उतरली स्वर्गीतली देवता, जन्मा घे भुवनांत या सकळ त्या द्याया स्त्रियां धन्यता. १३९ दिंडी. अशा मातेच्या उद्रिं जन्मलों, हें मातृलक्षण मम संकळ देहिं राहे; ह्मणुनि जन्मापासोनि मम मनांत स्त्रियांविषयीं सुविचार नांदतात. १४० धन्य, जन्मे जो अशा माय-पोटीं; असे थोडकियां भाग्य हें ललाटीं !