पान:इंदिरा.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०२ अंतिं भुवनीं उपजेल योग्य काळीं जाति मनुजाची पूर्ण भाग्यशाली." १३० साकी. नृपतनयाचे शब्द ऐकुनी सुस्कारा ती टाकी, बोलेः-“तैसें घडणें दिसतें अशक्य या भूलोकीं.” नृपसुत उत्तर दे; । ऐका, तिजला काय वदेः- १३१ श्लोक. (अश्वघाटी) “ नारीनरांमधिं असारा नको दुफळि, हारीं पडाल जगतीं; ॥ भावा मनीं सकल ठेवा, नका करुं दुभावा, वदें निजमती ! ॥ नाहीं सुखी पुरुष गेहीं स्त्रियेविण क दाही, पती सुखवि ती; || दावोनि कोमळ लळा सर्वदा पुरुषपादांस सेविति सती. १३२ पद. जिल्हा झिंजोटी. ताल त्रिवट. ( "चंद्रकेतु रविवंशीं” – या चालीवर. ) व्यर्थ जिणें, नरनारी एकटिं तीं राहतां; स्त्री-पुरुषीं ऐक्य व्हावें, इष्ट असे विवाहितां; पुरुषांगीं न्यूनता जी, निवटो स्त्री पूर्ण ती ! स्त्रीमाजी उणिव जी हो, पुरुष हरो तिजप्रती ! १३३ साकी. ऐसें झाल्या होइ सफळ तो लग्नाचा उद्देश; पूर्ण असे तो विवाह, जेथें भेद नुरे लवलेश; दोघां हृदयांचा । झाला संधि तेथ साचा. १३४ बळें लाविल्या गांठि, ह्मणुनि का मन मनाशिं जुगतें तें ? 'विधिनें गांठी बांधियल्या' - हें वचन न ये कामातें; लग्नीं हृदयांची । व्हावी जोड सदा साची. : १३५