पान:इंदिरा.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०१ पद. राग काफी, ताल त्रिवट. ( "संया करे चतुराई रे” – या चालीवर.) सुख नुरे मनुजास गे, । सुख नुरे, तनु झुरे, । अंतरे स्त्री-प्रेमा ज्यास ! ध्रु० काय नर-तनुनें जननिं मरणिं पडावें । फुकट भवजंजाळीं ? । स्त्रीविणें गृह उदास; १ सुख नुरे. १२५ श्लोक. परस्पर जयीं अगे निज-समागमें स्त्री-नर बघोनि गुणदोष तीं करितिल स्वरूपांतर- स्त्रिया प्रबल अंशतः, नर मनीं तसे कोमल, तयेच समयीं जगीं सफळ आयु तें होइल. १२६ आर्या. विद्या संपादावी, परि गृहकृत्या कधीं न त्यागावें; संसारीं निजभर्त्या सुख संतत होइ, तेविं वागावें. १२७ वाढवुनी निजबाळा, बाळासम शुद्धचित्त राहावें, ऐसा परमेशाचा आहे संकेत पूर्ण समजावें. १२८ श्लोक. प्रसंग मग येइ कीं पुरुष सर्व तैशा स्त्रिया मनें करुनि मोकळीं, सुख परस्परां द्यावया प्रयत्न करिती, जयीं विषमता नुरे लेशही; स्वतंत्र, परि ऐक्य तीं करुनि, शोभवीती मही. १२९ दिंडी. होइ जगताचा तयीं समुत्कर्ष; दुभावाचा होणार न तो स्पर्श;