पान:इंदिरा.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०० तुझ्या सौख्यालागीं जगि जंव जगें लाविन मन, तुझ्या साह्या सारें करिन तुज-स्वाधीनचि धन. ११९ साकी. दोघां-ठायीं असे योग्यता; आपण थोर कुळींचीं, दोघे मिळुनी स्त्रीची सुधरूं स्थिति, दे तव कर, याचीं; चढवूं उच्च पदा, । जगता असती ज्या सुखदा. १२० दिंडी. कशासाठीं स्त्री नरा- ऐशि व्हावी ? तिणें कां गे नरकृती आचरावी ? पुरुष- साम्यात कां मनीं वहावी ? नरांची गे कृति नरांनी करावी ! १२१ पुरुष-नारी हीं आपुलिया देहीं; तेविं मानस-घटनेंत भिन्न पाहीं; पिंड पुरुषांचा असे निर्मियेला शौर्य-धैर्याला, बळा दाविण्याला. १२२ स्त्रियांनीं गे परि गृहीं राहुनीयां, सिद्ध व्हावें गृहकार्य तें कराया; प्रेम जागवुनी नरां सौख्य द्यावें; नरां ना तरि गे कुठे सौख्य व्हावें ? १२३ दादरा दुंबरी. राग पिलू, ताल एका. "मौला मेरा जाने रे"-या चालीवर. कोठें सौख्यालागीं गे! त्याणें जावें सांगें गे ! स्थान एकचि त्याला गे! ध्रु० गृहिंचें सुख तें | स्त्री पायीं जागे; ॥ जो भोगी, तो जाणे गे ! १ कोठें सौख्यालागीं गे० !