पान:इंदिरा.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९९ ह्मणोनी स्त्रीतें - जी अखिल मनुजां भावि जननी- सुधारावें यत्नें, सकल गुणिं तैसें तनिं मनीं, तरी होती बाळें जननिसम तीं भूषण कुला; नसे माते-अंगीं सुगुण, तरि ये कोठुनि मुला ? ११३ जशी ती असे, तेविं होईल बाळ; सवें तें तिच्या घालवी सर्व काळ; तिच्यापाशिं रांगे, तिच्या हातिं खेळे, पडोनी कुशी तें तिच्या नित्य लोळे. १९४ तिचें बोलणें चालणें बाळ पाही, जयीं माय खांदे कटीं त्यास वाही; न दे शिक्षणा ती, तरी ही शिके तें, घडे जें बरें वावगें माय-हस्तें. ११५ असावी यासाठीं सकळगुणसंपन्न जननी, मुलांच्या जी व्हावी परमकुशला योग्य अवनीं; कशी होई योग्या, प्रबळ नर जों सांप्रत रितीं हरोनी स्वातंत्र्या बुडविति सदा दायि युवती ? ११६ अगे साध्वी ऐकें तुजसि वरुनी मुक्त करिन; तुझ्या स्वातंत्र्यातें न कधिंहि विवाहीं बुडविन; नरांची गे बाधा तुज न कधिं होईल अणु ती; धजे स्त्री गांजाया कवण नर ? घेईन झडती ! ११७ स्त्रियांच्या दास्याचें करिन, करुनी यत्न, हरण; तुझ्या गे आनंदें करिन कृतिचें मी प्रसरण; तुझ्या सांगातें मी झटुनि अवघ्या योग्य पुरुषां, तुझ्या सत्कार्यार्थी फिरविन सहाय्या दश दिशा. ११८ नको एकाकी तूं श्रम परि करूं या दृढपणें, जगाच्या हालांचा तिळहि तुज ना स्पर्श घडणें ;