पान:इंदिरा.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९८ जसा पावतो तो पदा नीच-उच्चा, तसा पालटी तो पदांतें स्त्रियेच्या. १०७ श्लोक. मणीबंधवृत्त. बोलशि कां तूं:-'मी न वरीं' ? होइ ग! तूं माझी नवरी ! ठेविन निष्ठा तूजवरी, घेइन तूझें कार्य करीं. १०८ स्त्रीजनकार्या साधिन मी; आगमिं स्त्री, तैशी निगम; सौख्य गृहीं त्या देति स्त्रिया, नाहिं जगीं गा ! जोड तयां ! १०९ श्लोक. नरांच्या गे नारी जगतिं असती मैत्रिणि सती ! नगं-नारीं-लागीं अखिल भुवनीं एकचि गती, बसावें सांगातें दिनरजनिं त्यांहीं समसमा, अगे या देहाचा मज दिसतसे हाचि महिमा ११० स्त्रिया न जरि चांगल्या सकळ होति सान्या स्वयें, मुलें कशिं ग चांगलीं, उपजतील कोण्या नयें ? असे ग जशि खाण ती, तशिच पोटिं माती वसे; असे जननि सद्गुणी, तरिहि बाळ तैसें असे. १९१ जरी न जननी गुणी, तशिच उच्च देहीं मनीं, कशीं सुगुणि लेंकुरें जनन पावती कोठुनी ? जया कुळिं घरीं मुलें उपजती अर्धी तेथुनी, गुणावगुण-अंकुर प्रगटती मुळापासुनी. ११२