पान:इंदिरा.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पिपीलिका ती शोषिल सागर, होइल रविची रक्षा, अन्नपाणि जन टाकुनि घेतिल वडवाग्नी निजभक्षा, परि हो दुजि अबला । नुपजे कधिंही जोड मला!" १०१ श्लोक. ऐसें जैं वदली तटस्थ भरले डोळे तिचे अश्रुंनीं; मुद्रा म्लान दिसे पडे निसटुती पद्यावली हातुनी; गेली रात्र, तमासि सूर्य लपवी तेजोमयीं रमिनीं, जाई ती भरुनी पुरी वसुमती पक्षी-सुमंजुस्वनीं. १०२ उठुनि जावया इंदिरा निघे, झणिं तिच्या करा चंद्रकेतु घे; स्वकर फीरवी तन्मुखीं, वदे:- “कृति तुझी अगा! थोर, तापदे ! १०३ नको आपणा तूं सती दोष देखूं; नरातें हि तेंवीं नको शब्द लावूं; नसे कांहिं अन्याय गे त्या नराचा, नसे तो नियंता, न कर्त्ता जगाचा. १०४ जगाच्या क्रमाला बहू काळ झाला, जसा आधिं होता तसा होत गेला; स्वयें सृष्टि जैशा क्रमें नित्य चाले, तया न्यायमार्गोंचि हें सर्व झालें. १०५ जरी भार्या तूं या-उपरी मम होशील सुखदा, महा-निष्ठेनें त्वत्कृतिस अवघ्या रक्षिन सदा; अगे संतोषे मी सकळ-युवत्युत्कर्ष- अवनीं- प्रतिज्ञेनें सांगें- 'श्रम करिन संगें निशि-दिनीं.' १०६ असे कार्य जें ! इंदिरे त्या नरांचें, नसे काय तें कार्य त्याही स्त्रियांचें ?