पान:इंदिरा.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९६ मानोनी नर पूर्ण दुष्ट अवघे तत्संगती सोडिली; 'संहारा पुरुषांचिया उपजली'-संज्ञा अशी जोडिली; बुद्धीनें दुसऱ्यांचिया फसलि ती; झाली पराधीन ती; घोटाळ्यामधिं तैं स्वयें पडलि ती, हाणूनियां रुयुन्नती ! ९४ दिंडी. परी आहे तीवीच प्राणी, कितीही ती मार्न दुर्विचार आणी; प्रेम हृदयीं तें मानवांविषींचें राहि जागृत, जें मूळ सत्सुखाचें. ९५ साकी. अनुभव याचा पूर्ण पहा, तो कैसा घडुनी आलाः-- केला द्वेष जरी पुरुषांचा, तरि वळली नृपबाला, दावी तत्परता । नृपसुत-अवनीं राजसुता. ९६ जाया कोमळ अंतर होतें निःसंशय बाळीचें, परि चुकली ती शिकुनी लक्षण नाशक तें अन्यांचें; अंतीं वळली ती, । काळें पालटली कुमती. ९७ समजहि नव्हता त्या बाळेला, केवळ तरुण वयें ती; वाढत बुद्धीवर्द्धन झालें, विचार उठले चित्तीं ! ठावें तिज झालें, । भोळ्या भावें फसवीलें. ९८ अहोरात्र तिथ बैसुनि सेवित सन्निध नृपतनयाला, सृष्टि - चमत्कृति तिणें पाहिली, जाणीलें जगताला; बोले “अजि कळलें, । भोळ्या भावें मीं फसलें. ९९ करुनि घेतलें हास्य जगामधिं, कधिं ऐसें ना झालें; मूर्ख माझिया सम ना स्त्री कुणि, सृष्टी जोंवरि चाले; धुंडल्या पृथिवीला, । न मिळे कधिंही जोड मला. १००