पान:इंदिरा.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पद. त्याच चालीवर. संसारिं स्त्री-सौख्य टाकुनि देती, साधु असें कुणी ह्मणवूनि घेती ! साधुत्व काय स्त्रीसंगें मिळेना ? गृहिं काय मन तें प्रभुशीं वळेना? भस्म शरीरा लावूनि बसती, गिरिगव्हरीं कुणि दिनरात वसती, जाणति ना परि, गृहिं त्या स्त्रीयेचें विरहानळें भस्म होई साचें ! परि काय बोलेल बापडी जाया ? सर्वस्वि आधीन जी पतिराया ! पतिराय ऐसें नाम अशांला शोभे कधिं ? तें द्यावें कशाला ? ९० श्लोक. न माझ्या हातें हें सकळ युवतीकार्य घडलें जया आरंभीलें, उपजत जरी तेंचि पडलें, नको जाणूं कीं जें युवति ह्मणती सर्व खुळ तें; स्त्रियांची पाहोनी स्थिति मम बहू चित्त सलतें.”९१ ऐशा सुंदर इंदिरा वदलि तैं वाक्यां खज्या स्पष्टशा; वर्णीली, घडली असे बहुपरी स्त्री-लोकिं जी दुर्दशा; ज्ञानार्त्ती धरिली खरी कुमरिनें, शाळाहि संस्थापिली, उन्मादा वरिलें परी, स्वकृति तैं नाशा तिणें वाहिली. ९२ नरां न वरणें असा करि किमर्थ खोटा पण ? पहा वरुनि दुर्मदा, निजमनाप्रती आपण गुलाम करुनी ह्मणे मनिं "स्वतंत्र आहे स्वयें;" स्वतंत्र अशिये रितीं कधिं स्त्रियांस होतां न ये. ९३