पान:इंदिरा.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९४ धृतिशौर्यादिधर्म सारे समरीं ते दाविती, सोबतिणिला भव-वनींच्या परि बहु ते जाचिती. ८८ पद. रागिणी भैरवी, ताल दीपचंदी. शकुंतलेशीं काश्यप सांगे 'ऐशिये रीतीं सासरीं वागें:- ‘पतिकोपीं नम्र असावें, सवतीशीं प्रेम धरावें.' * परि ना सांगे, कां सवत असावी, पतिकोपवृष्टी कां तीच व्हावी ! कां न पतीने विवेक करावा, कां न स्त्री- देखत कोप निवावा ! कोमळ शीतळ सुखदा सदा जी, देखोनी कां जीव व्हावा न राजी ? एक-पत्नी व्रत कां नाचरावें ? सोडूनि कां एक दुजिला धरावें ? पुरुषां कुणि हा अधिकार दिधला, कीं तो जगाचा धनि एक बनला ? दोन स्त्रियांशीं सम-प्रीतिनें तें आचरण कैसें सम कधिं होतें ? आवड - नावड दुःखद शिरती, गृहिं सुखकंद तेणेंचि नुरती; पुरुषांची अशि दुःसह करणी, वरण्याहुनी त्यां, पडावें मरणीं ! ८९

  • किलोंसकरकृत संगीत शाकुंतल, पृष्ठ ७२, प्रथमावृत्ती.