पान:इंदिरा.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९३ सुवर्णखाण खणाया गेल्यें विकळ अशा शस्त्रांनीं ! जलधिपयातें शोषायाला गेलें कीं चिंध्यांनीं ! आरंभीं ऐशी । चुकल्यें, चुकल्यें हाय कशी ! ८४ पद. रागिणी भैरवी, ताल त्रिवट. (“ संतपदाची जोड” – या चालीवर. ) आतां मी कर्माला । लावूं दोष कशाला ? ध्रु० घडुनी आलें हातिंच माझ्या, । त्यागियलें विनयाला ! १ आतां मी .कर्माला० ८५ पद. राग परज, ताल त्रिवट. (“तो नर गति चुकला" — या चालीवर ) परि मी काय करूं? काय करूं ? | तुजला कैशि वरूं ? विचार केला खोटा, । अंतीं फसलें झाला तोटा ! १ परि मी काय करूं० ? दिसशी शूर वीर मोठा, । जाणें तव मनिंची उत्कंठा; २ परि मी काय करूं ? ८६ श्लोक. कशी रे या अर्पू सकळ ? कशी जीवा देवूं नर-करिं, अरे सांग मजला ? असे जाती ज्यांची प्रतिकुळ सदा स्त्रीजनसुखीं, घडे मैत्री त्यांशीं कवणपरि सांगें निजमुखीं ? ८७ पद. जिल्हा झिंझोटी, ताल त्रिवट. (“चंद्रकेतु रविवंशीं” – या चालीवर. ) पुरुष किती दुष्ट रीतीं वागविती स्त्रीजना ! नियमानें एकपक्षी; निर्दय तद्भावना; १७