पान:इंदिरा.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९२ श्लोक. / असें गाइलें गीत त्या इंदिरेनें; बहू होइ संतोष मंजु स्वरानें; तदा राजपुत्र स्वनेत्राप्रती तो हळू ऊघडोनी, तिला न्याहळीतो; ७९ युग्म.) तयिं सुमुख तिचें त्या वाटलें म्लानसें तें; बहु गहिंवरली, ना हाललीं नेत्रपातें; धरणिसि अति लज्जा पावुनी, न्याहळी ती, मनन करि असें कीं 'वागलें कोण रीतीं.' ८० पद. जिल्हा झिंजोटी, ताल त्रिवट. ( " चंद्रकेतु रविवंशीं" – या चालीवर. ) घडिमाजी सुचिंतेनें मृदुकाया कोमली ! गलितांगी लाजरीच्या वल्लीसम जाहली ! मुख तिचें बघुनि ऐसें, अंतरि जी गांजली, विव्हळला चंद्रकेतु; मनिं करुणा दाटली. ८१ साक्या. पांडुरता तिजवदनीं आली, कंपित झाले हस्त; चमके नेत्रीं सौजन्य तिचें, जरि ती चिंताग्रस्त. बोले अपणाशीं- । “चुकल्यें, चुकल्यें, हाय कशी ! ८२ गेला गेला लीनपणा मम अंगींचा तो सारा ! लीनपणाविण मत्कार्याचा होता केविं पसारा ? आरंभीं ऐशी । चुकल्यें, चुकल्यें, हाय कशी ! ८३