पान:इंदिरा.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९१ हिम नगशिखरावरी नांदतें, शिथिल करी हृदयाला; अन्य रीति परि धरणीवरती जागृत करि प्रेमाला; प्रेमा नगशिखरी । नांदत न कधिंच अंतरीं. ७३ अद्रीशिखरावरुनी येई विद्युत् चपला पायीं; ऐकुनि तूझें वर्णन भुललों, आलों मी या ठायीं; येई! तुजसंगें । क्षणभरि चित्त तरी रंगे. ७४ परस्परें तीं संगें रमल्या हृदयें जडुनी जाती, अंतीं प्रेमा उद्भवुनीयां एकचित्त जन होती; घडतां संधि असा, । येई वळ त्या प्रेमरसा. ७५ यास्तव येई, नांदें सन्निध; नांदूं दे तव संगें ! सुखविन तुजला, आळवीन मी भुलविन नानारंगें; अंर्ती जिंकिन मी, वरुनी नेइन निजधामीं" ! ७६ श्लोक. "सहस्र जेथें सरिता वहाती, धरेसि मंजु स्वनिं गाजवीती, असे ध्वनी ये सखि ऐकण्याला नगाचिया सोडुनि माथियाला. ७७ पंजाबी कुंबरी. राग केसुरी, ताल त्रिवट. “शतशा लहरी नाचति जेथें, तुषारमय पय फेंकिति पंथें; ॥ ध्रु० ॥ मंजुळ कोकिळ - रव जिथ नांदे, ऐशा स्थळीं ये; सन्निध रसुं दे; ||१|| शतशा०" ७८