पान:इंदिरा.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जशि पडतां गगनिं उल्का निजमार्गा दाखवी, सखे तैसें मनन तूझें मञ्चित्ता दीपवी” ! ६७ साक्या. "सायंसमयीं मावळताहे नलिनीकमळ तडागीं, खद्योतांचे थवे जमुनियां चमकति जागोजागीं, ऐशा तूं काळीं । राहें जागृत वेल्हाळी ! ६८ निद्रासुख हें घ्याया प्राणी निजगृहिं सारे जाती, परि गे राहें जागृत प्रियकरी ! तूं माझी सुखदाती ! मजला रमवाया, । वैसें सन्निध ये ठायां" ! ६९ श्लोक. "दिनकर बघ, अस्तालागिं तो दिव्य जाई, सुचिर कमळ डोहीं, पाहिं तें, धांव घेई; मम हृदयसरोजीं तेविं येई प्रिये गे । कमळमुखि शुभांगे, कोमळे, कोमळांगे ! ७० नगशिरावरुनी सरिता जशी उतरते, सखि तूं उतरें तशी करित नृत्य कड्यां-गडग्यांवरी ! तुझिच वाट बघीं इथ सुंदरी” ! ७१ साकी. “पर्वतशिखरावरि राहुनि तूं काय करिशि सुखशाली ? ये गुंफेच्या ठायिं विहारा वासंतिक सुख-कालीं ! अद्री सोडुनियां, । येई धरणीच्या ठायां ! ७२