पान:इंदिरा.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८९ साकी. या-उपरी त्या नृपतनयाला गाढ सुनिद्रा लागे, बैसुनि तत्सन्निध प्रेमें ती अहोरात्र तिथ जागे; दोघां सुख झालें, । अंत योग्य घडुनि आलें. ६३ एक रात्रिं जैं सुखनिद्रेतुनि जागृत नृपसुत झाला, नेत्र उघडुनी पाहे तंव तो देखे तिथ नृपबाला; बसली सन्निध ती, । होती पद्यावळि हातीं. ६४ कोमळ शब्दें आपणासि ती पद्यावळिंतुनि गीतें गात होति, तीं परिसुनि झालें सुख बहु नृपतनयातें; ऐका काय सती । गीतें मंजु स्वनिं गाती:- ६५ पंजाबी कुंबरी. राग केसुरी, ताल त्रिवट. (“गा हो जगपति ” —या चालीवर.) "निद्रासुख घे अवघी अवनी; तरुवल्लरि स्थिर अपुल्या स्थानीं. ध्रु० संतत चंचळ जलधितरंगीं मीनहि झांकिति नयन सुरंगी; १ निद्रासुख० अशा प्रसंगीं खद्योतचि तो तेजोरूपी जागृत राहतो; २ निद्रासुख ० तद्वत् माझ्या रूप प्रियेचें चमकत शोभे रम्य प्रतीचें; ३ निद्रासुख० " ६६ पद. जिल्हा राग झिंझोटी-ताल त्रिवट. (“चंद्रकेतु रविवंशीं" -या चालीवर. ) “नभि शोभे अस्तमानीं जें तारामंडळ ! तशि उदितां चांदणी तूं! अंतरिं गा ! प्रेमळ;