पान:इंदिरा.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८८ साकी. कोमळ परि तूं भासशि मजला पालटलें तव रूप, वरिलें ना, परि धरलें करिं मज रक्षियला तनुदीप; स्वप्नावस्था ही । केलिस कैशी ? ती पाहीं ! ५८ स्वप्नावस्था पूर्ण करीं ही, तत्सुख मज भोगूं दे ! जीवन-आशा नुरली, आतां त्वत्करिं भरुं दे मोदें ! आला प्राण गळीं, । देई चुंबन या वेळीं! " ५९ दिंडी. वदत ऐसें सद्गदित कुंवर झाला, कंठ दाटुनि गहिंवरें पूर्ण गेला, भान नुरलें, काळोखि नयानं आली; स्मृती नाहीं, गति पुढे काय झाली. ६० एक राहीलें तयाचिये ध्यानीं, वचन आटपतां इंदिरा उठोनी, वांकुनीयां तन्मुखातें न्यहाळी, चुंबि प्रेमभरें सती तया भाळीं! ६१ पद. राग हमीर-ताल त्रिवट. ( "कृष्ण गडी आपुला । यमुनाडोहिं बुडाला”—या चालीवर.) दोघांचा झाला । अजि संधि, असा झाला ॥ध्रु०॥ गेला मनिंचा दुभाव सगळा, । गर्व तिचा गळला; द्वेष नरांचा हासुनि गेला, | प्रेमा उद्भवला; नृपतनयाला मित्र मानुनी, । हृदयीं तो धरिला; स्त्रीकोमलता- प्रकाश पडला, । नृपसुत वांचविला; १ ऐसा संधि आजि झाला. ६२