पान:इंदिरा.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८७ श्लोकं. प्रमिलार्जुनांचें तिथ चित्र दूजें, पडद्यावरी रेखित दिव्य साजे; प्रमिला जिनें अर्जुन जिंकियेला, वसवोनि राज्यास प्रताप केला. ५२ साकी. त्या चित्रांतें सती इंदिरा प्रेमानें न्याहाळी, बहु गहिंवरुनी नयनांतुनि ती ढळढळ अश्रू गाळी; नृपसुत-हस्तातें । घेउनि, कुरवाळी त्यातें. ५३ गहिवरला तो राजपुत्रही पाहुनि नृपतनयेला, न्याहाळुनि तन्मुखा घडीभर, विव्हळ मनिं बहु झाला; मानवं हृदयाचा । ऐसा चमत्कार साचा. ५४ / जेविं पारिजातक उमलुनियां सुंदर सायंकाळीं, चंद्रमुखाला अवलोकी तें बसुनी आपुल्या ढाळीं, अंगीं सुकुमार | शोभा दावी तैं थोर. ५५ तैसा नृपसुत निजशय्येवरि उमलत जणुं का पुष्प, नृपतनया-मुखचंद्र न्याहळी तेजोमय बहु रूप; बोले नृपतनये । प्रेक्षुनि नृपसुत अति विनयें:- ५६ पद. जिल्हा झिंजोटी, ताल त्रिवट. (“चंद्रकेतु रविवंशीं" - या चालीवर. ) युग्म “सन्निध का असशि साक्षात् हे मत्प्राणेश्वरी ! स्वप्नीं कीं मी ग ! आहें, मज न कळे सुंदरी ! होतिस जी पूर्वकाळीं; तशि असल्या अंतरे संसारीं सौख्य मातें, प्राण-हरे, मी नुरें ! ५७ १ इंदिरा वृत्त – श्लोक ८ वा.