पान:इंदिरा.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८६ पद. जिल्हा मांझ, ताल त्रिवट. ( "छाये मधुबन में ”—या चालीवर. ) त्यातें ह्मणवीन मी आपुला; प्रसंगी जेणें रक्षीलें, । त्यातें ह्मणवीन मी० ॥ ध्रु० ॥ सरिता-लहरी -माजि पडोनियां । होतें बुडत जयीं, । तेणें मज काढीलें, ॥ त्यातें ह्मणवीन मी० ॥ १ ॥ कैशि आजवरी । माझिये अंतरीं । सारी स्मृति भासली, । कृतघ्न जहालें ? ॥ त्यातें ह्मणवीन मी० " ॥ २ ॥ ४८. श्लोक. इंदिरे मनीं ऐशिये परी खेद उद्भवे; निश्चया करी- “राजपुत्र कीं योग्य तो वर, देई मी तया आपुला कर. " ४९ ज्या कोठडीमाजि पडे बिछाना, भिंतीवरी तेथ विचित्र नाना होतीं सुरंगी बहु रम्य चित्रे पोथ्यापुराणांतिल नारि-पात्रे. ५०. दिंडी. एक त्यांमधिं भिल्लीण पार्वतीचें चित्र होतें शितिकंठ शंकराचें, सत्व पतिचें ती हरावया आली रूप पालटुनी तैं हिमाद्रि - बाली. ५१