पान:इंदिरा.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अग्नी-सन्निध ठेवितां वितळुनी जाई जसें तें घृत, राखाया बसतां तशी सतत ती सत्यध्वजाचा सुत, अंतीं ये द्रव तीजला, कळवळे पाषाणरूपी मन, पाहोनी नृपजाचिया बहुविधा क्लेशास रात्रंदिन. ४२ श्लोक. राग माड, ताल त्रिवट. (सत्यध्वजाचें मुख पाहुनीयां, |चिंतातुराची उपजोनि माया, भ्रात्यां-पित्याची उमजोनि वृत्ती, | केला तिणें अल्प विचार चित्तीं:-४३ युग्म॰॰“हे सांगती सर्व सभोंवतालीं | तें सत्य भासे, शुभ सर्वकालीं; 'पांचीं मुखीं ईश्वर नित्य नांदे' - (ज्ञानी सदा उक्तिस कान या दे. "४४ बोले मनीं:- "हे जुगतात जोडे, क्रीडोनि संगें नरनारि कोडें; मोदूनियां प्राणि परस्परांतें, संपादिती इष्ट जगीं सुखातें.” ४५ साकी. विवेक ऐसा करुनि इंदिरा गहिवरली प्रेमानें, ह्मणे - "त्यजावें काय तयाला रक्षियलें जळिं ज्यानें ? श्रमला मजसाठीं, । सांवरिलें मज निज पाठीं! ४६ सोडुनि ग्रामा मजलागीं जो धुंडित वरण्या आला, लढला मत्प्राप्यर्थ वीर-नर, जर्जर रणिं तो झाला, त्यातें अव्हेरूं ?। कोठें सौख्या मग पावूं! ४७