पान:इंदिरा.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८४ श्लोक. घडिमधिं तिजला तो "इंदिरे !" हांक मारी, "सुखकर ! तरुणी गे !" ऐशिये तो प्रकारीं वदुनि मुखिं, जणूं कीं प्रेम दावी मनाचें परि उमजुनि ये कीं भान त्या नाहिं साचें; ३७ ह्मणे तिजशिं, "मत्प्रिये ! हृदयरंजने राजसे! " धरी स्वकरिं तत्करा, परि न भान त्यातें असे; करीं धरुनि अंगुली नृपकुमारिची प्रेक्षितो, जशीं रमति बालकें, रमत तेथ तो, लोळतो; ३८ | ह्मणे कधिंकधीं तिला, "कठिण गे तुझें इंदिरे असे हृदय तें किती ! | द्रवुनि अद्रिही पाझरे, परी न तव मानसीं किमपिही दया उद्भवे; कितीहि तुज आळवीं, परि न चित्त तूझें द्रवे. ३९ पद. रागिणी बागेसरी, धिमा तिताल. ("प्रीति लागो तुझीये दृढतर पायीं"-या चालीवर.) काय ऐसा शुभांगे ! धरिशी ग हेका ? ध्रु० नको नको ह्मणशी | कशा, फुका त्यागिशी गृहींचें सौख्य तूं ; १ काय ऐसा शुभांगे." ४० विशेषक. श्लोक. वाटे राजसुते, स्थितीस बघुनी त्या चंद्रकेतूचिया, कीं बुद्धिभ्रम होउनी सुकुळिंचा पावेल भानू लया; चिंतेमाजि अशा सती बसतसे शय्येचिया सन्निध, रात्रीं ती अपरात्रिंही श्रम करी सप्रेम नानाविध ४१