पान:इंदिरा.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८३ पद. जिल्हा झिंझोटी-ताल त्रिवट. (“चंद्रकेतु रविवंशीं"- या चालीवर. ) उद्भवलें इंदिरेच्या प्रेम तदा अंतरीं; बैसूनी चंद्रकेतू-सन्निध ती सुंदरी कुरवाळी हस्त त्याचे, गोंवी त्यां निजकरीं, गाउनियां प्रेम गीतें राजसुता मोहरी. ३४ साकी. नृपतनयाला परोपरी जरि नृपजेनें रमवीलें, चैन पडेना जिवा तयाच्या, क्लेशें त्या ग्रासीलें. कासाविस होई, । जणुं का प्राण घडिंत जाई. ३५ पद. राग धनाश्री, ताल एकी. (“विश्वेश्वर प्रभु पतितोद्धरणा" या चालीवर.) भग्न-अस्थि-वेदना भोगिल्या असतिल दुर्दैवें ज्यानें, त्यासचि उमजुनि येईल त्या किति भोगीलें नृप- तनयानें. ध्रु० तत्सन्निध नृपतनया बैसे कुरवाळित निजहस्तानें; भिरकावुन दे हस्त तियेचा, क्षणि अपुल्या तो हृद- या ने; १ भग्न-अ० भान तयाला नुरलें कांहीं, विगलित झाला अंगानें, नयन असुनि तो अंध जहाला, ध्वनि ऐकेना कर्णानें; २ भग्न अस्थि - वेदना० ३६ १ या पदास "हरिणाक्षी ती चाल, अथवा "लाल शालजोडी चाल शोभये. माझ -सं० शाकुंतल, अंक, ६, जरतारी" - सं० सौभद्र अंक, ४, ही