पान:इंदिरा.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८२ दिंडी. इंदिरेनें हे शब्द आयकीले; आड होती, कुणिं तिज न पाहियेलें; कमलजेचें मुख इंदिरा न्यहाळी, शब्द वदली ना, स्तब्ध परत गेली. २८ कमलजेनें हा पाहिला प्रकार; ह्मणे अंतरिं कीं- “चुके एक घोर; हिची वृत्ती वळली दिसे विवाहीं, नसे लग्ना उरला निषेध कांहीं.” २९ श्लोक. राग कालिंगडा, ताल त्रिवट. (धिमा.) इंदिरेप्रती मग पुन्हा अतां चंद्रकेतुचा विनवितो पिता, वीरभद्र तो, अनुजही दुजे, तातही तसा, वदत आत्मजे:- ३० "कन्यके अगे, समज तूं धरीं, योग्य संधि ही, नवरि हो तरी; योग्य वीर जो पुत्र सद्गुणी, योग्य तो तसा होइ गे धणी. ३१ साकी. ऐशा सुंदर पुरुषाचा तूं कां करिशी अव्हेर ? ना ह्मणशी उगा कासया, त्यागिशि कां संसार ? चित्तीं मनन करीं, । अझुनिहि नृपपुत्रास वरीं. " ३२ ऐसें ह्मणतां निशिदिनिं तिजला, तिचिया चित्तिं विचार लग्नाचा हळुहळू शिरुनि मनिं झाला तत्संचार; अंतर पालटलें, । लग्नालागीं वश झालें. ३३