पान:इंदिरा.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८१ श्लोक. मधुकरी कर ये-परि रक्षितो परम कोमलसा कमलाक्ष तो; विकृतिमुक्त झणीं जयिं जाहला, त्यजिलि शेज, सुखें फिरूं लागला. २१ साक्या. ज्या काळी त्या शैलपायथ्यापाशीं अधिं घोटाळा होउनि, नारी तिरडुनि गेल्या अवघ्या त्या वेल्हाळा, शशिकला वदली । वाणी, मिथ्या ती ठरली. २२ भाकित केलें तिणें असें तैं- "येइल घड्डुनी साचें लग्न तये निशिं शशिकलेशीं मार्गी शशिवदनाचें; ” मिथ्या तें ठरलें । भाकित, घडुनी ना आलें. २३ माय कमलजा हिजला मिळवुनि दिधली मंजुळी बाला, परि शशिवदना तिनें न वरिलें, वश झाली ना त्याला; मिथ्या वचन ठरलें । भाकित घडुनी नचि आलें. २४ कमलजेचा शशिवदनाला लागुनि गेला ध्यास, कमलजेला उमजुनि आलें, परि ना लाभलि त्यास; अंतरिं आवडला, । परि तो नाहीं स्वीकरिला. २५ तिला वाटलें, स्वीकरितां त्या, पुनरपि लग्नविधीचा प्रसंग येउनि, कोप निश्चयें खवळे नृप-तनयेचा; ह्मणुनी शशिवदना | कमलजा झाली ती वश ना. २६ एके दिवशीं बसलि सती जैं सन्निध शशिवदनाच्या, औषधपाणी पाजुनि सांगे गोष्टी रम्य परीच्या, बोले तो तिजला । “साध्वी, वरिं गे तूं मजला." २७ १६