पान:इंदिरा.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८० पुरुषां जो ना रुचला, । हर हर ! कैसा तो अंतीं बुडला ! ।। १ ।। विपरित समय हा आला ! " १५ " श्लोक. ऐसा हा घडला प्रकार अवघा त्या मंदिरा-भीतरीं; गेला काळ बहू, मुळीं न उठला तो चंद्रकेतू परी; रात्रंदीस पडे निचेष्ट; अमिता नारी उभ्या भोंवत्या; बाहू-अस्थि-विदारणें नृपसुता झाले बहू क्लेश त्या. १६ साक्या. कमलाक्षाला भगिनि कमलजा पाजी औषधपाणी, मधुकर येउन तिजसांगातें बोले मधुरा वाणी; मंजुळ वचनांनीं । तोषवि, प्रेमळशा गानीं. १७ जिला पाहुनी सुख नेत्रांतें होइ सदा मनुजांच्या, विशेष सुखवी सन्निध येतां समयीं ती दुःखाच्या; साक्षात् संजिवनी । तत्पर वीरांच्या अवनीं. १८ दिंडी. तयासन्निध बैसोनि मधुकरी ती, रमवि कमलाक्षा बहुत गोड रीतीं; कथा सांगे त्या पुराणांतरींच्या, तयें रूपा ती दावि स्वांतराच्या. १९ श्लोक. असे नवल काय तें, बसुनि एकटीं दोन तीं घडोघडि परस्पर स्वमन काय तें जाणती ? समक्ष कमलाक्ष तो पडुनि क्लेश-शय्येवरी स्वरूप वळखी तिचें, तिज अपेक्षि जो स्वांतरीं. २०