पान:इंदिरा.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बीज पेरिलें म्यां, फळ-वेळा जवळी ती येतां, कीड लागली तेणें त्याचें पुष्पचि ना फुललें; लागुनि जातां लतेस वाटे रम्य कळे कंवळे, झंझामारुत सुटोनि सगळे तैसेची गळले ! ॥ १ ॥ काय महा मम हातुनि ऐसें० १२ ज्ञानपान जिथ व्हावें, तेथें घायाळ आले, विध्वंसुनि या नगरीलागीं थोर वीर पडले ! झाला सारा घोंटाळा हा, कार्य लया गेलें; ऐशी फसलें समूळ, आतां कांहिं नसे उरलें ! ॥ २ ॥ काय महा मम हातुनि ऐसें० १३ पद. ( "बहुत छळियेलें नाथा" - या गर्म्याच्या चालीवर. ) एक मीं अंवतिलें, । दैवें अन्य घडविलें ॥ ध्रु० ॥ स्थापियलें मुक्तीमार्गा म्यां, । बिघडीलें दैवें कार्या अबलासौख्या सुगतीला; ॥ रे ! कैसें निष्ठुर दैवा, वैभव स्त्रीचें नाशियलें! ।। १।। एक मीं अंवतिलें० १४ पद. ( "अरसिक किति हा शेला" - या चालीवर. ) विपरित समय हा आला ! । या मंदिरीं पुरुषप्रवेश जहाला ! ॥ ध्रु० ॥ ऐशा कर्मगतीला । काय ह्मणावें स्त्रीहीनतेला ? जो पथ मीं काढीयेला, । ज्याचीये वृद्ध्यर्थ बहुयत्न केला, निजग्राम ज्यासाठीं त्यजिला, । दुर्लौकिक जगीं जयं मिळवीला,