पान:इंदिरा.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९
श्लोक.

ऐसें योजुनि, पूर्ण चंद्र नभि तो झाल्या अधीं सौंगडी
आनंदें भरले तिघे उतरले, लावोनि बुर्जी शिडी;

गेले गांवकुसाचिया पलिकडे, भीती परी मानसीं,

हाहाकार पडोनि राजगृहिं कीं जासूद ये पाठिसीं. ३६

कड्याच्या बाजूनें, हरित शिखरीं ज्या वन सजे; 

नद्या, नाले, जैं कीं स्थल सुजलनृत्यें गजबजे;
दया, खोया, शेतें उगवति जिथें नूतन उतें;

असे उल्लंघीले बिकट पथ यत्नें नृपसुतें. ३७

 बुर्जी किल्ल्यां देखतां उच्च उच्चां
 राजग्रामा पातले दक्षिणेच्या;

 शोधोनीयां राजमंदीरमार्ग,

 रायापाशीं ठाकला तो त्रिवर्ग. ३८

 शब्दीं केले राजियानें प्रसन्न;
 देवोनीयां भोजना मिष्ट अन्न,
 केलें त्यांचें आदरातिथ्य पूर्ण,

 लग्नाची ना गोष्ट; ती झालि जीर्ण. ३९

साक्या. राग जोगी- - ताल एका.
चवथ्या दिवशीं युवराजानें लग्नाचा अनुवाद
बहुयुक्तीनें केला, ज्याचा रात्रंदिन त्या नाद;
बोले " वद राया । होइ न कां ती मम जाया ? ४०
बहुवर्षीच्या जोडाचा कां करिते कुमरि विजोड;
बहु काळाचा जडला प्रेमा कां घडवी घडमोड ?
सांगा अजि राया । होइ न कां ती मम जाया ?" ४१