पान:इंदिरा.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०
श्लोक.

बोले राय गजेंद्र, “सत्य वदतां, संकल्प केला असे,

बाळा वाढविली स्वतंत्र, पण हो तो मान्य मुग्धे नसे; 

कन्या मागतसां, रितीं गमत या, सन्मान राखीतसां;
सांगा काय करूं परी, कवण त्या योजूं उपाया, कसा ? ४२

जन्मा आलें कुळिं अमुचिया रत्न हैं दिव्य थोर, 

त्यापासोनी गृहिं अवदसा पातली से अघोर;
दुर्दैवानें सुखद जननी माउली, माझि पत्नी
गेली बाळे त्यजुनि; दुहिता वाढवीली स्वयत्नीं. ४३

साकी.

बाल्यापासुनि या तनयेनें सुख नाहीं मज दिधलें,
भलभलते मनिं विचार आणुनि विरसचि जीवन केलें;

ऐसा कर्माचा । घडला खेळ गृहीं साचा. ४४ 

वाढत होती जननीविरहित तनया जैं, तिजलागीं

ममताविरहित शिक्षण मिळलें, तैं ती झालि विरागी,
आतां मज न कळे । उघडूं केविं तिचे डोळे. ४५

अंजनीगीत.राग माढ - ताल एका.
लग्नाचा म्यां करार केला,

तो तिजलागीं अमान्य झाला; 

काय करावें या तनयेला,
 न कळे मज आतां. ४६
बालपणीं आवडती बालें,

तोषविती मृदु प्रेमळ बोलें;