पान:इंदिरा.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



" साध्वी कां मजला न तूं वरिशि गे ! मोहाब्धि हे इंदिरे !

कां हे वागविशी विचार, मजला संसार जैं अंतरे ? ३१ 

वारा मंजुळ वाहतो उपवनीं, माधुर्य जैं तैं वसे,
कां गे राजसुते ! मनीं, तव मुखीं, माधुर्य तैसें नसे ?

" ऐसें भाषण आपणाशिं करि जों वध्वार्त्तिनें जिंकिला,
"ये ये दक्षिणपंथिं ये, जय मिळे !" व्योमीं ध्वनी ऐकिला . ३२

व्योमींचा ध्वनि ऐकुनी, स्मित बहू, न्याहाळितो अंबरा
,

मेघाच्छादित चंद्रकोर बघुनी, बोले सुधाराधराः- 

" हे मेघा, जगजीवनाऽमृतमया ! हे चंद्रम्या शीतला !

द्या शांती, मम आर्त्त मानसिं हृदीं मोहाग्नि हो चेतला.” ३३
दिंडी.

गृहीं आला तेथोनि राजपुत्र,
बलावूनी आपणापाशं मित्र,
वृत्त कथिलें, संकेत मानसाचा;
ह्मणे:-" दावा अजि मित्रभाव साचा". ३४

पद. कुंबरी, राग सिंदुरा,,—ताल त्रिवट.
(निकनजर मोरा मन – या चालीवर. )
अजि इतर नाहिं इष्ट मम मनीं । गड्यांनो,
पाहूं या नृपकन्या; ॥
योग्य जरि ती दिसली तरि हरूं । हो, तियेला ॥ ध्रु० ॥
वधू सतत चित्तिं घोळे । दिनराती । मज कांहीं
चैन पडत मुळिंच नाहीं, । तळमळतों मी; ।
विनति एवढि माझी परिसुनि । मजसंगें या. ॥ १ ॥
अजि इतर नाहिं० " ३५