पान:इंदिरा.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७८ जेथे विद्यालय स्थापीलें, घायाळां तें स्थान जहालें; आतां वैभव सारें गेलें, बुडलों आह्नि नारी! ९ होवो होइल तैं उत्कर्ष; स्त्रीवृंदाचा परामर्श घेतां, झाला पुरुषस्पर्श; बुडलों आह्नि नारी ! १० पद. जिल्हा काफी, ताल त्रिवट. ("जन हो तारक श्रीजगदीश्वर जाणुनी" - या चालीवर.) अवघें स्त्रीजन- तारक कृत्य कसें हैं । निमिषांत गेलें लया ! ॥ ध्रु० ॥ नरगण मिळुनी, स्त्रीराज्य छळुनी, विध्वंसियलें तया! ॥१॥ अवघें स्त्रीजन-तारक० आयुष्यभर हा स्त्रीजन-देहो, दासत्विं वेंची वया; ॥ २ ॥ अवघें स्त्रीजन तारक० काबाड वाही संसारडोहीं, परि ये न पुरुषा दया; ॥ ३ ॥ अवघें स्त्रीजन-तारक० उन्नती मार्गाप्रत या स्त्रीवर्गा, आशा नुरे न्यावया ॥ ४ ॥ अवघें स्त्रीजन-तारक० ११ पद. जिल्हा झिंजोटी.' ( " अभाग्याच्या घरीं बाबा कामधेनु आली"-या चालीवर.) काय महा मम हातुनि ऐसें पातक तें घडलें. इच्छा मनिंची पूर्ण न झाली, सुकृत अंतरलें! ॥ ध्रु० ॥ १ या पदाला चौथ्या सर्गातील "कां अश्रु हे नयनीं येती !" या पदाची चाल लावतां येते. तशीच, या काव्यांतल्या पांचव्या सर्गातल्या "स्त्रीजातीला पुरुष कसे हे," पदाचीही चाल लावावी. या दोन्ही चाली खेदपर आहेत.