पान:इंदिरा.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७७ श्लोक. घायाळांच्या पाशिं बैसोनि कोणी गीतें गाती, पाजिती पेजपाणी; शब्दें, बोलें, नम्रता सर्व नारी दावोनीयां तोषवीती विहारीं. ४ दिंडी. चित्तिं झाली परि इंदिरा उदास; कार्य गेलें समुळीं तिचें लयास; बहुत लज्जित मनिं झालि फार खंती; कृती आरंभिलि, घालविलें अंतीं! ५ श्लोक. आली ग्लानी; ना कुणासंगतीं ती कांहीं बोले, ना करी काम हातीं; बैसे जेथें, ऊर्ध्व दृष्टी करोनी, तासांचे ती तास काढी बसोनी. ६ दिंडी. कधीं जाई उद्यानिं ती फिराया उषःकाळीं, वा तीनसांजठायां; तिचें अंतर परि रमेना विहारीं; वदे:- "पडल्यें मी, हाय, केविं हारीं ! ७ अंजनी गीत ( राग माढ-ताल एका ). झाली मत्कार्याची माती, गेलें सारें पुरुषां- हातीं; होती जैसी पूर्वी स्थिति, ती झाली नारींची ! ८