पान:इंदिरा.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संलग्न नामक सर्ग सातवा. पद. राग मौलकंस, अथवा हमीरे, ताल त्रिवट. नगरीचा विध्वंस | झाला, नगरीचा विध्वंस ! | ध्रु० ॥ भगिनि-कृतीच्या नाशालागीं । शिरले जणुं नर-कंस; झाला नगरीचा० ! ॥ १ ॥ अपेश आलें कांचनपुरिला, । पडे तिचा अवतंस; । झाला नगरीचा० ! ॥ २ ॥ मनिं नर ह्मणती योग्य अंत हा, । होतें कार्य नृशंस ! झाला० ॥ ३ ॥ - १ दिंडी. रूप पालटले सर्व मंदिराचें; होइ पालन तिथ योग्य त्या नरांचें; नारि सेविति सप्रेम आवडीनें; सौख्य घायाळां होतसे तयानें. २ पूर्व उन्मादा अंत पूर्ण आला; पुरुषनारींचा संधि दिव्य झाला; जेथ पुरुषांचें नांव नाशियेलें, तयां- लागीं उपचार तेथ झाले. ३ १ मालकंस राग:- “लाविली थंड उटी वाळ्याची.-" या चालीवर; [ सं० शाकुंतल - अंक ३, किलोंसकरकृत ] २ हमीर राग:- "मज हें तापद गृह झालें. -" या चालीवर; [ सं० मृच्छकटिक अंक १, अण्णा मार्त्तडकृत. ]