पान:इंदिरा.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७४ साकी. टाकुनि जाई जरी शशिकला, एकटि वाहिन भार; सुवेळिं नेइन कार्य तडीला, नुरला जरि आधार; परि हो नच आजी । घडि या यश ये स्त्रीकार्जी.” १११ श्लोक. संतप्त झाली बहु राजबाळी, आला झणी ताम्र सुरंग भाळीं; बंधू पिता शांतविती तियेला; सत्यध्वजें यत्न तदर्थ केला. ११२ उचलुनि पडलेले सर्व घायाळ नेले; जतन करुनि, साज्यां मंदिरीं रक्षियेलें; मिसळति नरनारी, भेद ना अंतरंगीं; नगरि गजबजोनी गेलि ऐशा प्रसंगीं. ११३ दिंडी. राजपुत्रा विस्तीर्ण खोलिमाजी ठेवुनीयां, इंदिरा तथा पाजी दिव्य औषधि, जो भागला सुयुद्धीं, रणीं पडल्याची ज्यास नसे शुद्धी. १९४ सर्व घायाळां औषधोपचार योग्य रीतीनें जाहला उदार; तयें श्रमलेल्यां सौख्य फार झालें, इंदिरेला सत्कार्यश्रेय आलें. ११५ साकी. कितिक युवतिंचे सैन्यामाजी भ्राते आले होते; एकमेक तीं वळखुनि अपणां, चालति सुखि सांगातें; सौख्या पार नसे; । भगिनी-प्रेम असेंचि असे ! ११६