पान:इंदिरा.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७३ तदा वदलि इंदिराः-“कमलजे! तुझा बंधुही चला नगरिं नेउं या, तुज न ठेविं चिंता गही. १०५ वीर संगरीं लडुनि भागले, घाय ज्यांचिया तनुंस लागले, त्यांसि मंदिरीं इथुनि न्यावया पातल्यें, चला सकळ नेउं या !” १०६ परिसुनी अशिया वचनाप्रती, शशिकला करुनी मुख वक्र ती, वलिः - " का करिशी अजि इंदिरे ! स्वकृतिचें तुज भान कसें नुरे ? १०७ पद. जिल्हा झिंजोटी. ताल त्रिवट. ( " चंद्रकेतु रविवंशीं - या चालीवर. " ) करुनि तूं नियम कैशी निज वचना मोडिशी ? बहु वर्षे पढविलें जें, क्षणिं कैसें विसरशी ? पुरुषांना ओळखीत्यें, ह्मणुनी हा तूजशी पथ म्यां गे दावियेला, परि अंतीं फशिं पडशी!" १०८ श्लोक. धिक्कारवाणी परिसोनि ऐशी तैं इंदिरा, उत्तर दे न तीशीं; गर्जोनि बोले परि सिंहनादें, तैं अंतरिक्षीं घन-शब्द कोंदे :– १०९ — “जो जो मूच्छित येथ युद्धिं पडला, वा शत्रु वा मित्र हो, न्या सर्वो निजमंदिरा स्थिर मनें; मानूं नका भीति हो ! देई दोष मला जरी शशिकला, त्यागी मला ये घडी, चिंता काय?-उठा, चला, सकळिकां न्या मंदिरा तांतडी. ११०