पान:इंदिरा.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७२ श्लोक. राया हो अपुल्या महाबळि सुतें मत्प्राण संरक्षिला- झाला हा उपकार, तैं बुडवुनी टाकीयलें हो मला; बोलूं या-उपरी नका मजप्रती कीं ही कृतघ्ना असे; याची अंतरिं साक्ष पूर्ण वसते, दुष्टा किती ही दिसे. १०० या, हो, या! नगरा तुझी अमुचिया; या इष्टमित्रांसवें; नारी जातिल सर्व त्या निजगृहीं; त्यांहीं कशा राहवें ? मत्कृत्या तडि न्यावया अजि मुळीं हो ! संधि ना योग्य ही; नित्याचा क्रम तोचि इष्ट दिसतो- स्त्रीनें खपावें गृहीं. १०१ प्रार्थी सादर मी तुम्हांसि नृपती! ऐका वचा माझिया ! ताता! बांधव! मी तुम्ही अळवूं या मायाळु रायांसि या, कीं येवोनि दया तयां निजसुता देतील ते न्यावया; वाला भीक मला, झणी मजसवें आतां निघा जावया."१०२ नेत्रीं तिच्या अश्रु भरोनि आले, सत्यध्वजें उत्तर नाहिं केलें; राहे उभा स्तब्ध अधोमुखें तो, चित्तीं परी हर्षित थोर होतो. १०३ तदा शैशि विनम्र तो कमलजेस बोले:-“सती! तुझा अनुज सुंदरे! रणि पडे धरे; त्याप्रती अगे सकळिकांसवें इथुनि न्यावया मंदिरा दयार्द्र नृपकन्यके! विनविं तूं स्वयें इंदिरा. १०४ तयाप्रतिहि लागले बहुत घाय या संगरीं; तयांसि उपचार गे कवण तूजवीणें करी ?” १ शशिवदन.