पान:इंदिरा.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७१ तुटुनि अझुनि गेला नाहिं, तो भेटुं ये गा ! विगलित मम या गे ! लाव ये अंग अंगा. ९३ बहुत मजसि वाटे लाज माझ्या कृतीची; विसरुनि गत गोष्टी, शांतता मन्मनाची प्रियकरि करिं गे तूं, मागतें त्वत्क्षमा मी, यदुपरि वसुं तूझ्या संगतीं जीर्ण धामीं. ९४ साकी. अपराध तुझा नाहीं; झाला प्रारंभी माझाची; स्त्रियां येउं कां दिलें जयांशीं सलगी होति नरांची ? झाली दोघांना । शिक्षा; अंतरलें माना ! ९५ होतों जैशा मैत्रिणि, तैशा झार्लो;-ये मम माते !- झालें गेलें त्याची वार्त्ता पुनरपि मनिं नाणीं तें; देवी ! साक्षी तूं । रक्षीं निजमनिंचा हेतू ! " ९६ श्लोक. युग्म. · सत्यध्वजातें अनुलक्षुनी ती, बोले, "महाराज ! असे विनंती; द्या पुत्र, नेतें निजमंदिरातें, धुवीन, चोळीन तथा स्वहस्तें. ९७ श्लोक. ( मणिबंधवृत्त. ) (नाशियलें तैं मत्कृतिला, । देह परी हा रक्षियला; | स्त्रीजन स्वातंत्र्या मुकला; । चंद्र परी योद्धा ठरला; ९८ | व्याकुळ घायांनी पडला, । रक्षिन त्याच्या मी तनुला; प्राण न गेला तो लढतां, । देवि-कृपा ही थोर अतां! ९९

  • चंद्र = चंद्रकेतु.