पान:इंदिरा.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७० साकी. सत्यध्वज तिज बोले:- “साध्वी जाणुनि कोमळ तूतें, रुकार दिधला, न्यावें पुत्रा उपचारा तुजहातें. वाटे परि चुकतों, । देतां त्वत्करिं सुत, मुकतों. ८८ दिंडी. जरि न अपुल्या तूं जातिच्या जिवाला बघुनि कळवळशी दुःखि मैत्रिणीला, काय अन्यांला ठाव गृहीं देशी ? शिरीं वैन्याचा भार काय घेशी ? ८९ बघुनि विपरीता सर्व त्वत्कृतीला, भीति वाटे बहु माझिया जिवाला; औषधाच्या तूं करुनियां मिषाला, पोटिं पुत्राच्या घालिशिल विषाला. ९० नको नेऊं त्या तुझ्या मंदिरातें; धुविन, चोळिन मम सुता मीच हातें; करिन उपचारां यथाशक्ति पुत्रा, शिथिलता मम जरि असे आलि गात्रां." ९१ श्लोक. परिसुनि अशि वाणी राय सत्यध्वजाची, गहिंवरलि मनीं ती इंदिरा पूर्ण साची; द्रवुनि हृदय गेलें ऐशिया वाक्शरांनीं; उपजलि मनिं लज्जा; गांजली ती निदानीं. ९२ वदलि कमलजेला:- “ ये अगे सत्वरी तूं, कवळुनि उरिं मातें गे ! धरीं; प्राणतंतू