पान:इंदिरा.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६९ श्लोक. अशासाठीं का गे, तुज नगरि आरंभि दिधली ? सुखाचीं पूर्वी म्यां जिथ घडि-पळे घालवियलीं; जिथे आनंदानें रमुनि, रमवोनी निजजनां सदा संतोपीलें; करिशि तिथ का निष्ठुर मना ? ८३ दिंडी. बोल तिजशीं तूं बोल, सांगतों गे ! खेळलीशी बाळपणि जिच्या संगें; जिवा-कंठाची प्रिया काळिजाची कशी अव्हेरिशि ! हृदय कां न जाची ! सजे हें कां तुज, कीं तुझ्या कुळाला ? किती माजविशी आपल्या खुळाला ? काय वैभव शोभेल कृतीनें या ? प्रसवली गे, तुज व्यर्थ माझि जाया ? ८५ श्लोक. धिक्कार पाषाण-मना तुझ्या गे ! अद्यापि उन्माद शिरांत जागे ? ये शब्द ना एक मुखीं तुझ्या तो, माझा किती हा अपमान होतो!"८६ परि न शब्द मुखांतुनि इंदिरा मुळिंच काढि, न देतहि उत्तरा; बहुत लाज तिला मनिं वाटली; वदलि ना परि अंतरिं दाटली. ८७ १५