पान:इंदिरा.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



तिघेहि आपण चित्तीं एकच, भिन्न जरी अंगें; १ मित्रा ०
असे प्रवासी कोणि सहाय्या, विघ्न तरी भंगे; २ मित्रा०
लोह न वापरतां जैसें, तुजवीण तसा जंगें; ३ मित्रा०
न सोडूं तुज यमुना जशि सोडी ना गंगे”. ४ मित्रा० २७

श्लोक.

ह्मणे राय तो दीर्घ गर्जोनि वाणी,
वदे शब्द कीं गर्जतें अब्धि पाणी:-
"नका जाउं कोणी, लढोनी सुयुद्ध
करीतों खुषेची स्वयें मीच शुद्धी”. २८

दिंडी.
लाल झाले तन्नेत्र; तन्मुखाचा
दिसे वर्ण जणूं अग्नि मूर्त्त साचा; 

राजवाणी ती अंतराळं गेली,

विसर्जन मग नृपवरें सभा केली. २९ 

राजपुत्रे नृपवचन आयकीलें,
परी स्वविचारां नाहिं त्यागियेलें;
सभा आटपतां उपवनांत गेला,

भावि भार्येचा बहु विचार केला. ३०
श्लोक.

नेलें तेथ सुरम्य चित्र वधुचें त्या राजपुत्रं सवें,

बैसे ठेवुनि आपुल्या पुढतिं, त्या बोले बहू आर्जवेंः-