पान:इंदिरा.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

“आहे म्यां मज वाटतें, परिसलें, रक्तीं असे लोह तें; त्याची पूर्ण प्रतीति आजि मजला माझी सुता दाविते; नाहीं शब्द चकार एकहि मुखीं ! काठिण्य हें कोठचें येई गे हृदयांत पुत्रि तुझिया ? कैसें तुला हें रुचे ? ७७ पिंडापासुनी या तुला न जडली ही वृत्ति गे दारुण; नाहीं गे! तुज आइच्या तनुंतुनी हा लाधला दुर्गुण; होती सज्जन ती दयामय पुरी, संतांमधीं आगळी; कां ना भूतदया वसे तव मनीं, जैशी असे त्वत्कुळीं? ७८ परी जाणें नित्य प्रकृति तुझि तीव्रा दिसलि ती; असावी कोणाची वरचस तरी तूजवरती, ह्मणोनी योजीली गुरु तुजप्रती योग्यसमयीं; असें यावें त्याचें श्रमद फळ का आजि उदयीं ? ७९ जननि अंतरतां तुजला दिलें शशिकलेप्रति; तीजशिं योजलें निवडुनी तिज शिक्षक योग्यशी; बिघडशी तिजपार्थीि मुली अशी ! ८० दिंडी. शशिकले त्या मग सुधारावयाला योजिली म्यां ती कमलजा सुशीला; कमलजा तैं तुज गुरु दुजी जहाली. तिच्या साह्यिंच ही नगरि उदयिं आली. ८१ श्लोक. पुत्रि ? तूं वदशि एक न शब्द का? बोललों तुजशि का इतुकें फुका? कारणी बघ तुझ्या पडले किति वीर धीर नर मूर्छित हे क्षिति. ८२