पान:इंदिरा.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६७ नाहीं योग्य तुझ्या कृतीस अशि मी त्वन्मंदिरीं कीं वसें; माझ्या स्थानीं दुजीस योजुनि, करीं भावे तुला गे तसें. ७० जातें गे; गत-गोष्टिंला विसरुनी, मातें क्षमा तूं करीं; बोलें गोड सुशब्द एक, तुजला आहें ग मातेपरी; वर्षे कैक मियांचि रक्षुनि तुला ज्ञानामृता पाजिलें, आधीं या अति उत्तमा पथिं तुझ्या वृत्तीस म्यां योजिलें.” ७१ इंदिरा तिला " हूं" न बोलली, मंजुळेकडे दृष्टि लाविली; वीरभद्र तै क्रुद्ध जाहला, सिंहनादिं तो शूर बोललाः – ७२ "कठिण - हृदया होशी कैशी स्वजातिशिं इंदिरे ! बहुत पुरुषां देशी दोषां स्वजातिसमुद्धरे ! करुनि, भगिनी, ऐशी शोभा नको कुळ लाजवू; विनविं; निववीं क्षोभा सान्या; नको मज गांजवूं ! ७३ येवो, गे! करुणा तुला परिसुनी सप्रेम बंधूवचें; शोभे जाड्य न हें तुझ्या सुहृदया, साजे वराहत्वचे; घे हातीं कर गे हिचा, भगिनि ! या सप्रेम चुंबीं मुखा, वाल्यापासुनि वाढवोनि तुजला जैं पाववीलें सुखा. ७४ नयनिं बघ तिच्या हे अश्रु येती अपार; सलत हृदय माझें पाहुनी दुःख थोर; भगिनि! विनवि तूझा बंधु, योद्धा तुला गे! बघवत मज नाहीं हें मुळीं कोमलांगे !” ७५ परि न इंदिरा शब्द बोलली, क्षिति न्यहाळिती स्तब्ध राहिली; बहु पित्यास ये कोप तैं तिच्या, वदतसे तिला क्रुद्ध या वचाः-७ .७६