पान:इंदिरा.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६६ जा वत्से जिवड्ये प्रिये चिमकुल्ये जा होइं दीर्घायु गे ! चित्तीं ठेविन मी सुरूप तव गे, जो प्राण माझा जगे. ६४ शशिवदनि वेल्हाळे बाळे, कशी तुज अंतरें ! नलिनकलिके जातां, वाटे कसें मज गे बरें ! 'गुरुभगिनि' या नामें प्रेमें सदा तुज पाळिलें; पडशि अशि कां माते- हातीं ? फुका तुज रक्षिलें !” ६५ साकी. गहिवरुनी मुख मंजुळिचें मग नृपतनया कुरवाळी; "जा" वदली “सुखि होई वत्से!”—“घ्या, देतें ही बाळी! " “देवी रक्षावें, । हिजवरी कृपा-कवच घालावें” ! ६६ श्लोक. असें बोलोनी ती शशिकरिं तदा देइ कुमरी, तयें ठेवीली ती करिं शशिकलेच्या तदुपरी; धरी माता हातीं, शशिवदन - वीरा प्रणत ती; मिळाली कन्या जी, परम ममता न्याहळि सती. ६७ बहु कळवळली ती, अश्रु सानंद आले; वळवळ पुरि झाली; इष्ट तें प्राप्त झालें; हरणुलि हरिणीला सांडलेली मिळाली, कवळुनि उरिं धाली, तान्हली चुंबियेली. ६८ चुंबुनी स्मित अशा अधरा मुखा, पावली कमलजा अतुळा सुखा; खेळवूनि कुमरी अशिये रितीं, इंदिरेप्रति वदे मग नम्र तीः – ६९ “होतों मैत्रिणि गे; अतां परतुनी जातें स्वधामाप्रत; नाहीं या वदना पुन्हा तुजप्रती मी दाविण्या इच्छित; -