पान:इंदिरा.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६५ नाहीं तुझें जें, बळकाविशी कां ? कां त्रास देशी उगि दीन लोकां ? कां नाडशी गांजशि गांजल्यांतें ? कां मेलियां मारिशि दुष्ट घातें ? ५८ जरी आजी आहे हृदयिं तुझिया नांदत दया, जरी अंश स्त्रीचा तव तनुमधीं गे, तरिच या- घडीं देई बाळे नलिन- कलिके तूं कमलजे; कशा ठेवीशी तें, जननिप्रति जें बाळक सजे ? ५९ तुझी माता जातां, तुजशिं निजपुत्रीसम जिणें असे रक्षीयेलें, तिज नचि असें योग्य करणें ; तरी देई कन्या तिजशिं तिचि आतां गुणवते ! तुला लज्जा वाटे, तरि मजशिं दे; देइन तितें." ६० असे ऐकुनी शब्द धिक्कारयुक्त, चढे राजपुत्री-मुखीं नेत्रिं रक्त; परी कोप तीचा क्षणांतीं निमाला, उदेतांचि कीं सूर्य अस्तासि गेला. ६१ मुखा पाहुनी मंजुळेच्या सती ती द्रवे चित्तिं, त्या वत्सले घेइ हातीं; ह्मणे:- "बाळ माझें जरी बोलवीलें, तरी आजि त्या त्यागणें भाग आलें! ६२ जाशी तूं जननी-करीं, शुभ असो गे राजसे तूजला ! जाशी या नगरासि टाकुनि, जरी लावोनी माया मला, होवो माय तुला तुझी सुखकरी, तूझ्या पडो धार्जिणीं, जी माझी नचि जाहली, फसवि जी संपूर्ण सत्कारणीं! ६३ देवी राखु तुला सदा, सकळिकां जी सौख्य दे मानवां; बाधा होवु तुला न त्या नरकरीं, जे नाडती स्त्रीभवा;