पान:इंदिरा.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६४ पद. राग असावरी, ताल त्रिवट. ( "बाळा जाई परतोनी" -या चालीवर.) [सं० शाकुंतल, - अंक ४ ] द्यावें बाळक जननीला, दयाळे ! ध्रु० ॥ कैशी होशिल धन्य ठेवुनी अन्याची बाला ? ॥ १ ॥ द्यावें ० अंता आलें नाटक अमुचें, मित्र रणीं पडला ! ||२|| द्यावें आतां पुनरपि चालिव अपुल्या स्त्रीवैभवलीलेला; ॥ ३ ॥ द्यावें०. ५३ श्लोक. ऐकें भाकित आजि मी करितसें जाणूनि साज्या जगा, या ग्रामीं जमती स्त्रिया, तव करीं होवो तयांची निगा, स्त्रीप्रेमा तुझिया कृतीवरि जडो; वाटे मनीं पूर्ण या अंतीं एक दिनीं तुला न कळतां जाईल सारें लया. ५४ अर्ध्या गे जगतास तुच्छ करिशी, तें काय ना सूड घे ? काळेंही कलहासि मूळ कधिंना कांहीं इथें ना निघे ? झाला आपसि एकदां कलह या स्त्री-मंडळा-भीतरीं, होई सर्व जगीं पुरें हंसवणें, ही सत्य गे वैखरी. ५५ गेला मित्र रणीं पडोनि हरला, झाला मृतप्राय तो ! भूठायीं पडला, न हें कळत कीं मेला असे वा जितो ! स्त्रीप्राप्त्यर्थ उपाय या-उपरि ना होणार त्याचा सती ! त्वद्भ्रातें हरिलें अह्मांसि, तरली तेणेंचि तूझी कृती. ५६ जी तूं लग्न करावयासि नसशी राजी, तया तूजला, बाळें गे खुटलीं कशा ? करिशि का तूं घेउनी त्यांजला ? इच्छीशी मुळिं व्हाविना तुज मुलें, कां घेशि अन्याचिया ? कोठें तूं शिकलीस गे, पढविलें कोणीं तुला या नया ? ५७