पान:इंदिरा.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६३ साकी. इतुक्यामाजी शरीर ज्याचें होतें व्याकुळ झालें, शशिवदनें त्या इंदिरेचिया पायां कंवटाळीलें; जाई रांगुनियां, | विनयें तिजला विनवाया. ४९ श्लोक. पाहुनी तया गहिंवरे सती, घाय लागले बघुनि त्यांप्रती; रूप ओळखी, जवळि येत ती, गीतगानिं जैं बिघडली कृती. ५० दिंडी. तिला आठवला तदा तो प्रसंग, जयीं गेला बिघडोनि सर्व रंग; मुखा अवलोकित उभी नार राहे, शब्द वदला शशिवदन तैं तिला हे:- ५१ पद. राग पिलू; ताल त्रिवट. (“खचित बाई व्यर्थ आह्मी अबला " ——या चालीवर ). "हृदय बाई निष्ठुर कां करिशी? | निष्ठुर कां करिशी ? हृदय बाई० ॥ ध्रु० ॥ प्रबळ प्रतापी सुंदर वनिता । विशाळ जी दिसशी, । इंदिरे विशाळ जी दिसशी, ॥ १ ॥ हृदय बाई० ॥ माता-ममता बलवत्तर हें । केवीं नाठविशी ? | निपुण जरि, केवीं नाठविशी ? ॥ २ ॥ हृदय बाई० ॥ समरीं आह्मां जिंकुनि अजि तूं विजयी ! गे होशी, । खचित गे विजयी तूं होशी; || ३ || हृदय बाई० ॥ त्वदंघ्रिं गेलों दडपुनि आतां । व्हावें काय तुझीं, ।, अजुनि तरि व्हावें काय तुर्शीीं ? ॥ ४ ॥ हृदय बाई०. ५२