पान:इंदिरा.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६२ “देई गे" वदली सती "मम सुता, दे इंदिरे मंजुळा !" ऐकोनी परि इंदिरा द्रवत ना वाणी अशी कोमळा. ४५ पद. ( "सुधन्व्या मोह कसा"- -या चालीवर.) “अतिचतुरे तूं थोर उदारे, कैशी ना ह्मणशी ॥ ध्रु० ॥ नू- तन कलिका माझी बाळी ॥ न मिळे मजला पडुनि क पाळीं ॥ प्रसवल्यें अशि कोण्या काळीं ? ॥ आपुली ह्मण- वीशी; ॥ १ अतिचतुरे० ॥ पाडस माझें दशमासाचें ॥ बळकावीशी द्रव्य कुणाचें ? ॥ निर्दय होउनि माय-मुलीमधिं ॥ अंतर पाडीशी; ॥ २ ॥ अतिचतुरे तूं ॥ त्यागुनि आल्यें, बहु मी चुकल्यें ॥ ह्मणुनि काय मम रत्ना मुकल्यें ? ॥ दुग्ध उरीचें नाहीं सुकलें, ॥ तान्हलि दे मजशीं, ॥ ३ ॥ अति चतुरे० असेल बाळा झालि भुकेली; ॥ कैशी माझी बुद्धी गेली! ॥ व्यर्थ अर्भका शिक्षा झाली, ॥ पडलें हाय फशीं! ॥ ४ ॥ अतिचतुरे तूं० " ॥ ४६ श्लोक. ऐकुनी तिचें वचन प्रेमळ इंदिरा स्वयें परम कोमळ, पाहि रोंखुनी कमलजेकडे न्ह्याळि मंजुळे धरणिं जी पडे. ४७ स्तब्ध जाहली, न वच बोलली, चंद्रकेतुच्या जवळि ठाकली, एकवार त्या बघितलें तिणें, वेंचि जो तिच्याप्रति असें जिणें. ४८