पान:इंदिरा.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उषः समयिं जेवि ती दिनकरा निशा शोभवी, तशीच तिनसांजची जशि रविप्रभा लोपवी, स्वयें दिसुनि सुंदरा, तशि दिसे सती इंदिरा; न कांहिं बदली मुखें अखिल खुंटली तद्गिरा. ३९ दिंडी. इंदिरा ती मग स्तब्ध कांहि वेळ उभी राहे; कटिवरुनि उतरि बाळ कमलजेचें, तें ठेवि भूमि-ठायीं, पडुनि लोळे इंदिरेचिये पायीं. ४० साकी. इतुक्यामाजी कमलजा ती निजबाळेच्या पार्शी हळुहळु येउनि सस्मित कन्ये धरण्या जाइ उराशीं; धरणीं पडलेली । नभिंहुनि चांदणि जणुं आली. ४१ माते पाहुनि हातपाय ती प्रेमें नाचवि बाळा; काढियला ध्वनि प्रेमळ बाळे; परिसुनि येइ उमाळा; माता कळवळली; । घ्याया निजबाळी वळली. ४२ पाहुनि कृति ही सती इंदिरा हस्त तिचा झिडकारी, बोले:-"बाळी तुझी नव्हे ती, माझिच दिव्य कुमारी. देई मजला ती । नेदीं मी ही तुज हातीं. " ४३ बाळक राहे उगें ऐकुनी, ध्वनि हा; कंपित झालें; आ पसरूनी, माय ह्मणे मनिं, कां संकट हें आलें! लागे हाय जिवा, । कैसा विरह हा साहवा! ४४ श्लोक. आली ग्लानि मुखासि, घर्म अवघ्या अंगाप्रती तो सुटे; देखोनी निज अर्भका जननिला पान्हा दुधाचा फुटे;